Thursday, October 10, 2013

आधुनिक धनंजयाचे (सूडाचे) महाभारत


आधुनिक धनंजयाचे (सूडाचे) महाभारत

"हेतल पारेख", कलकत्ता येथील एक अठरा वर्षांची शाळकरी मुलगी एका माथेफिरू सुरक्षा रक्षकाकडून कशी कुस्करल्या गेली याची हृदयद्रावक कहाणी………………

हेतल आपल्या आई (यशोमती), वडील (नगरदास) आणि भाऊ (भावेश) यांच्यासोबत "आनंद अपार्टमेंट" नावाच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर रहायची. धनंजय  चॅटर्जी हा त्या इमारतीसाठी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. एक दिवस (दि..०३.१९९०) हेतलने तिच्या आईकडे तक्रार केली की शाळेतून येता जाता धनंजय तिला चिडवत असतो आणि त्या दिवशी तर त्याने तिला चक्क "माझ्याबरोबर सिनेमाला चल" असे म्हटले. धनंजयच्या चिडवण्याबाबत हेतलने त्यापूर्वीही अनेकदा तिच्या आईला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी यशोमती तिच्या पतीला या प्रकाराबद्दल सांगते. नगरदास तातडीने धनंजयच्या मालकाला (श्याम कर्माकर, प्रोप्रायटर, मे. सिक्युरिटी एंड इन्व्हेस्टीगेटींग ब्युरो) जावून भेटतात, झाल्या प्रकाराबद्दल सांगतात आणि एक लेखी तक्रार देवून धनंजयची बदली करून दुसरा सुरक्षा रक्षक नेमायची विनंती करतात. धनंजयचा मालक नगरदासच्या विनंतीवरून धनंजयची बदली "पारस अपार्टमेंट" मधे करतो आणि तिथला सुरक्षा रक्षक बिजॉय  थापा यची बदली "आनंद अपार्टमेंट" मधे करतात. हा बदलीचा आदेश दि..०३.१९९० पासून अंमलात आणायचा असतो.

दि..०३.१९९० रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नगरदास आणि भावेश घराबाहेर पडतात. नगरदास दुकानावर आणि भावेश कॉलेजमधे जातो. ११.३० चे सुमारास भावेश घरी परत येतो आणि जेवून वडीलांना दुकानावर मदत करण्यासाठी जातो. दुपारी एक वाजताच्या सुमारास हेतल तिची परीक्षा आटोपून शाळेतून घरी परत येते. त्यानंतर ती घरीच असते. रोज संध्याकाळी ५ ते ५.३० दरम्यान हेतलची आई यशोमती लक्ष्मी नारायण मंदिरात जात असते. नेहमीप्रमाणे ती ५.२० वा. घराबाहेर पडते. हेतल घरी एकटीच असते. धनंजय त्याच्या मालकाच्या आदेशाप्रमाणे पारस अपार्टमेंट मधे ड्युटीवर न जाता सकाळी सहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत आनंद अपार्टमेंटमधेच ड्युटी करतो. हेतलची आई घराबाहेर पडल्याबरोबर धनंजय हेतलच्या घरी जायला लागतो, इमारतीच्या खाली त्याला दुसरा सुरक्षा रक्षक दसरथ मुर्मु भेटतो, धनंजय त्याला सांगतो की तो हेतलच्या घरी ओफिसला फोन करायला जातो आहे. तो लिफ्टने वर जातो. तेवढ्यात तिथे त्याच्या कंपनीचा सुपरवायजर प्रतापचंद्र पाली येतो. तो दसरथला धनंजयने पारसमधे ड्युटी केली का ते विचारतो. तेव्हा तो त्याला धनंजय नुकताच वर गेल्याचे सांगतो. ते इंटरकॉमवरून हेतलच्या घरी फोन लावून बघतात पण फोन लागत नाही म्हणून दसरथ धनंजयला जोराजोरात हाक मारतो. सुपरवायजर आल्याचे सांगतो, धनंजय हेतलच्या घराच्या बालकनीत येतो आणि लवकरच खाली येतोय असे सांगतो. थोड्या वेळाने धनंजय जिन्याने खाली येतो. सुपरवायजर आणि दसरथ त्याला थांबवून विचारण्याचा प्रयत्न करतात की तो पारस अपार्टमेंटमधे ड्युटीवर का गेला नाही, तो त्यांना गेटच्या बाहेर या म्हणतो आणि सांगतो की काही वैयक्तीक अडचणींमुळे तो तिथे गेला नाही. सुपरवायजर त्याला दुसऱ्या दिवशीपासून पारसमधे ड्युटी बजावायला सांगतो, त्यानंतर धनंजय तिथून निघून जातो.

हेतलची आई ६.०५ चे सुमारास परत येते, लिफ्टमन रामधन यादव तिला धनंजय त्यांच्या घरी ओफिसमधे फोन करायला गेल्याचे सांगतो. हेतलने धनंजयबद्दल आधीच सांगितलेले असल्यामुळे हे ऐकताच यशोमतीला भयंकर राग येतो. ती लगबगीने फ्लॅटवर पोहचते आणि दारावरची बेल वाजवते पण दार उघडले जात नाही, ती आरडाओरडा करते, त्यामुळे सुरक्षा रक्षक, लिफ्टमन आणि शेजारी गोळा होतात. सर्वजण दार तोडायचा निर्णय घेतात आणि दार तोडले जाते. काही शेजार्यांबरोबर यशोमती घरात शिरते आणि पाहते तो काय………….तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडा असतो, ती आत शिरते, हेतल रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली असते, तिचे कपडे फाटलेले असतात. कपडयांवर आणि आजूबाजूला रक्ताचे डाग पडलेले असतात. अर्धनग्न अवस्थेतील हेतल बेशुद्धावस्थेत वाटत असल्यामुळे तिची आई तिला उचलून दवाखान्यात न्यायला निघते तेवढ्यात कोणीतरी बोलावल्यामुळे एक डॉक्टर येतात आणि हेतलला तपासून मृत घोषित करतात. थोड्याच वेळात दुसरेही डॉक्टर येतात आणि हेतल मरण पावल्याचे सांगतात. हेतलच्या वडील आणि भावाला निरोप जातात. तेही घरी परत येतात. एव्हाना हेतलचा खून धनंजयनेच केला असल्याचा सर्वांनाच संशय येतो, नव्हे खात्रीच पटते. नगरदास घरी पोहचल्याबरोबर भवानीपूर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती देतात, पोलीस लागलीच येतात आणि यशोमतीच्या बयाणावरून खुनाचा गुन्हा नोंदवतात. पोलीस घटनेच्या ठिकाणाहून  बऱ्याच वस्तू जप्त करतात आणि तिथे उपस्थित लोकांची बयाणे नोंदवतात, पोलीस तपासात आणि शव-विच्छेदन अहवालावरून हेतलवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न होते. पोलीस धनंजयचा कसून शोध घेतात शेवटी दि.१२.०३.१९९० रोजी तो पकडल्या जातो.


तपासात स्पष्ट झालेल्या काही बाबी अशा…….हेतलच्या शरीरावर एकूण २१ जखमा असतात, तिला प्रचंड मारहाण झालेली असते, तिच्यावर बलात्कार केलेला असतो, तिच्या आईचे "रिको" कंपनीचे घड्याळ चोरीला गेलेले असते ते धनंजय कडून जप्त होते, घटनास्थळी सापडलेली एक शर्टाची बटन धनंजयच्या शर्टाची असते असे फोरेन्सिक लेबोरेटरीच्या अहवालावरून स्पष्ट होते. वैद्यकीय पुरावे सुद्धा धनंजयकडेच अंगुलीनिर्देश करतात. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी धनंजयशिवाय कोणीही घटनास्थळी गेल्याचे दिसले नाही.

सर्व साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सत्र न्यायालयाने धनंजयला खुनाच्या गुन्ह्यासाठी फाशीची सजा, बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची सजा आणि चोरीच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षे सक्तमजुरीची सजा ठोठावली. कलकत्ता उच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला. धनंजयने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयात धनंजयच्या वकिलांनी तपासातील काही बारीक सारीक त्रुटींवर बोट ठेवत धनंजयला निर्दोष सोडण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने ( न्या..एस.आनंद आणि न्या.एन.सिंग यांचे खंडपीठ) ती अमान्य केली. मग त्यांनी धनंजयला फाशीची शिक्षा तरी ठोठावू नये कारण तो एक २७ वर्षांचा विवाहित तरूण आहे आणि फाशीचीच सजा देण्यासाठी काही विशेष कारण नाही तसेच ही "दुर्मिळातली दुर्मिळ" केसही नाही. सर्वोच्च न्यायालयाने धनंजयच्या वकिलांचा हाही युक्तिवाद अमान्य केला आणि खालच्या न्यायालयांनी दिलेल्या सर्व सजा कायम ठेवल्या. फाशीच्या सजेमुळे इतर सजा निरर्थक ठरतात पण कायद्यातील तरतुदींप्रमाणे त्या द्याव्याच लागतात. हेतलने केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आणि तिच्यामुळेच आपली बदली करण्यात आली असा ग्रह करून व्यवस्थित योजनाबद्ध रीतीने धनंजयने तिच्यावर बलात्कार करून आपली खूप दिवसांपासून मनात असलेली वासना शमवली आणि खूनही करुन बदला घेतला असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला. मार्च १९९० मधे घडलेल्या या घटनेचा अंतिम निकाल ११ जानेवारी १९९४ रोजी लागला. कधी कधी असे लवकरही निकाल लागतात हे महत्त्वाचे. एका सुरक्षा रक्षकाने जिचे रक्षण करायला हवे त्यानेच हे दुष्कृत्य केल्याबद्दल त्याची अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत मुळातच वाचायला हवे…………..


16. The sordid episode of the security guard, whose sacred duty was to ensure the protection and welfare of the inhabitants of the flats in the apartments, should have subjected the deceased, a resident of one of the flats, to gratify his lust and murder her in retaliation for his transfer on her complaint, makes the crime even more heinous. Keeping in view the medical evidence and the state in which the body of the deceased was found, it is obvious that a most heinous type of barbaric rape and murder was committed on a helpless and defenceless school-going girl of 18 years. If the security guards behave in this manner, who will guard the guards? The faith of the society by such a barbaric act of the guard, gets totally shaken and its cry for justice becomes loud and clear. The offence was not only inhuman, and barbaric but it was a totally ruthless crime of rape followed by cold blooded murder and an affront to the human dignity of the society. The savage nature of the crime has shocked our judicial conscious. There are no extenuating or mitigating circumstances whatsoever in the case. We agree that a real and abiding concern for the dignity of human life is required to be kept in mind by the courts while considering the confirmation of the sentence of death but a cold blooded pre-planned brutal murder, without any provocation, after committing rape on an innocent and defenceless young girl of 18 years, by the security guard certainly makes this case a 'rare of the rarest' cases which calls for no punishment other than the capital punishment and we accordingly confirm the sentence of death imposed upon the appellant for the offence under Section 302 IPC, The order of sentence imposed on the appellant by the courts below for offences under Section 376 and 380 IPC are also confirmed alongwith the directions relating thereto as in the event of the execution of the appellant, those sentences would only remain of academic interest. This appeal fails and is hereby dismissed.

  

   
अ‍ॅड. अतुल सोनक,
९८६०१११३००

No comments:

Post a Comment